Paris Paralympics 2024 – हिंदुस्थानची हॅट्ट्रीक, 100 मीटर शर्यतीत प्रीती पालने जिंकलं कांस्य पदक

अवनी लेखरा आणि मोना अग्रवाल यांनी तिरंदाजीमध्ये सुवर्ण आणि कांस्य पदक जिंकत हिंदुस्थानसाठी पदकांचे खाते उघडले होते. त्यामध्ये आता अजून एका पदकाची भर पडली असून महिलांच्या 100 मीटर (T35) शर्यतीत प्रीती पाल ने कांस्य पदक जिंकले आहे.

उत्तर प्रदेशातील मुझफ्परनगरची रहिवासी असणाऱ्या 22 वर्षीय प्रीती पालने 100 मीटर अंतर (T35) 14.31 सेकंदांमध्ये पूर्ण करत कांस्य पदकाला गवसणी घातली. चीनच्या झोऊ जिया हिने या स्पर्धेत 13.58 सेकंदात 100 मीटरचे अंतर पूर्ण करत सुवर्ण पदक पटाकवले तर चीनच्याच गुओ कियानकियान ने 100 मीटरचे अंतर 13.74 सेकंदात पूर्ण करत रौप्य पदक जिंकले आहे. प्रीती पालने कांस्य पदक जिंकल्यामुळे हिंदुस्थानच्या खात्यात तिसऱ्या पदकाची नोंद झाली आहे.