Paris Paralympics 2024 – दुसऱ्या क्रमांकावर असूनही पटकावले सुवर्ण पदक; वाचा नेमके काय झाले…

पॅरिस पॅरालिंम्पिक 2024 च्या स्पर्धेत हिंदुस्थानचा झेंडा नवनवीन विक्रम करत आहे. हिंदुस्थानने आत्तापर्यंत पॅरालिम्पिक कारकीर्दीतील सर्वोत्तम सहा सुवर्ण पदकांवर आपली नावे कोरली आहेत. आता हिंदुस्थानचा स्टार खेळाडू नवदीप सिंगने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक (F41) स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले आहे. त्यामुळे सुवर्ण पदकांचा आकडा आता सातवर पोहोचला आहे.

अंतिम सामन्यात नवदीप सिंगने (F41 ) दुसऱ्या प्रयत्नात 47.32 मीटर भाला फेकला, जो त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वोत्तम थ्रो होता. पुरुषांच्या भालाफेक (F41) स्पर्धेत प्रथमच हिंदुस्थानी खेळाडूने सुवर्णपदक जिंकले आहे. F41 वर्ग उंचीने लहान असण्ऱ्या खेळाडूंसाठी आहे. आतापर्यंत 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 14 कांस्य पदके जिंकली आहेत. त्यामुळे पदक तालिकेत हिंदुस्थान १६व्या क्रमांकावर आला आहे.

याआधी नवदीपच्या सर्वोत्कृष्ठ कामगिरीमुळे तो रौप्य पदकाचा मानकरी होता आणि इराणचा सदेघ सयाह बेतसुद्धा त्याच्यासोबत होता. परंतु या सामन्यानंतर सदेघ सयाह अपात्र ठरला. त्यामुळे नवदीपच्या रौप्य पदकाचे सुवर्ण पदकात रुपांतर झाले. सदेघने पाचव्या प्रयत्नात 47.64 मीटर भाला फेकला. मात्र त्याच्या एका कृतीमुळे तो पॅरिस पॅरालिम्पिकमधून रिकाम्या हाताने परतणार आहे.

पॅरिस पॅरालिम्पिक समितीने सदेग सायाह यांच्या अपात्रतेची कारणे अद्यापही उघड केलेली नाहीत. मात्र इराणच्या खेळाडूने सामन्यादरम्यान वारंवार आक्षेपार्ह झेंडा दाखवला, त्यामुळे त्याला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले. यासाठी त्याला सामन्यादरम्यान पिवळे कार्डही दाखवण्यात आले.