Paris Paralympics 2024 – प्रवीण कुमारची सुवर्ण उडी अन् टोकियो पॅरालिम्पिकचा विक्रम निघाला मोडीत

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंनी धमाकेदार प्रदर्शन करत पदकांची लयलूट केली आहे. आज सहव्या दिवशी त्यामध्ये भर पडली असून पुरुषांच्या उंच उडीमध्ये प्रवीण कुमारने सुवर्ण पदक पटकावले आहे. विशेष म्हणजे या पदकासोबत हिंदुस्थानच्या खेळाडूंनी 6 सुवर्ण पदक जिंकत टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये 5 सुवर्ण पदक पटकवल्याचा विक्रम मोडीत काढला आहे.

Paris Paralympics 2024 मध्ये हिंदुस्थानच्या प्रवीण कुमारने (T44) आशियाई विक्रम मोडीत काढला आहे. त्याने पुरुषांच्या उंच उडी T64 स्पर्धेत 2.08 मीटरची सर्वोत्तम उडी मारत सूवर्ण पदक जिंकले आणि हिंदुस्थानच्या खात्यात सहाव्या सुवर्ण पदाकाची नोंद झाली. तसेच या प्रकारात अमेरिकेच्या डेरेक लॉकडेंटने रोप्य आणि उजबेकिस्तानच्या टेमुरबेक गियाजोवा याने कांस्य पदक जिंकले.

प्रवीण कुमारने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये जिंकलेल्या सुवर्ण पदकामुळे हिंदुस्थानच्या खात्यात एकून पदकांची संख्या 26 झाली आहे. यामध्ये 6 सुवर्ण, 8 रौप्य आणि 12 कांस्य पदकांचा समावेश आहे. त्याचबरोबर हिंदुस्थान गुणतालिकेत 26 पदकांसहित 14 व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे हिंदुस्थानचे हे पॅरालिम्पिकमधली आतापर्यंतचे सर्वोत्तम प्रदर्शन राहिले आहे.