Paris Paralympics 2024 – हिंदुस्थानचा दुहेरी निशाणा! अवनीचा सुवर्णभेद तर, मोना अग्रवालने कांस्य पदकावर उमटवली मोहर

Paris Olympics 2024 मध्ये हिंदुस्थानला सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली होती. मात्र पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये हिंदुस्थानची नेमबाज अवनी लेखराने सुवर्ण पदक पटकावले आहे. त्याचबरोबर याच गटात नेमबाज मोना अग्रवालने कांस्य पदकावर मोहर उमटवली असून हिंदुस्थानच्या खात्यात एक सुवर्ण आणि एक कांस्य पदकाची नोंद झाली आहे.

Tokyo Olympics 2020 मध्ये सुद्धा अवनीने सुवर्ण पदकावर निशाणा साधला होता. तसेच 50 मीटर एअर रायफल थ्री पोझीशन प्रकारात कांस्य पदक पटकावले होते. तोच जोश कायम ठेवत 22 वर्षीय अवनीने Paris Paralympics 2024 च्या फायनलमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल (SH1) स्पर्धेत 249.7 गुणांची विक्रमी कमाई करत पुन्हा एकदा सुवर्ण पदकावर मोहर उमटवली आहे.  त्याचबरोबर अवनी पॅरालिम्पिकमध्ये दोन वेळा सुवर्ण पदक पटकावणारी पहिली हिंदुस्थानी महिला खेळाडू ठरली आहे. या प्रकारात हिंदुस्थानच्या मोना अग्रवालने 228.7 गुणांची कमाई करत कांस्यपदक पटकावाले तर दक्षिण कोरियाच्या ली युनरिने रौप्य पदक पटकावले.