Paris Olympics 2024 – कुस्तीपटू रितिका क्वार्टर फायलनमध्ये पराभूत, तरीही पदकाची आशा कायम

हिंदुस्थानची महिला कुस्तीपटू रितिका हुड्डाला क्वार्टर फायलनमध्ये पराभवाचा धक्का बसला. 76 किलो वजनी गटामध्ये किर्गीस्तानच्या कुस्टीपटूने रितिकाचा पराभव करत सेमीफायलमध्ये प्रवेश मिळवला. मात्र असे असले तरीही रितिकाला कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे.

रितिकाने क्वार्टर फायनलमध्ये सामना किर्गीस्तानच्या आयपेरी किझी या वर्ल्ड चॅम्पियन कुस्तीपटूविरुद्धा होता. या सामन्यामध्ये रितिकाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत सामन्यात वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र आयपेरीने सुद्धा तोडीस तोड खेळ केल्यामुळे अखेर सामना 1-1 अशा बरोबरीत सुटला. शेवटच्या क्षणी आयपेरी किझी हिने गुणांची कमाई केली, त्यामुळे तिला विजयी घोषीत करण्यात आले. असे असले तरी रितिकाला कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे. रितिकाला ही संधी रेपचेसिंगच्या माध्यमातून मिळू शकते. म्हणजेच जर आयपेरी किझी फायनलमध्ये जाण्यास यशस्वी ठरली, तर रितिकाला कांस्य पदकासाठी खेळण्याची संधी मिळू शकते.

रितिका हुड्डा अवघ्या 22 वर्षांची असून तिची ही पहिलीचं ऑलिम्पिक स्पर्धा आहे. विशेष म्हणजेच एवढ्या मोठ्या स्तरावर पहिल्यांदा खेळताना रितिकाने दमदार प्रदर्शन करत सर्वांना प्रभावित केले. तसेच क्वार्टर फायलनमध्ये वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूला कडवी झूंज दिली.