Paris Olympic 2024: विनेश फोगाट प्रकरणी केंद्रीय क्रीडा मंत्र्यांचं संसदेत निवेदन; पुढील कारवाईची दिली माहिती

हिंदुस्थानची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक देत इतिहास घडविला. याचा हिंदुस्थान आनंद साजरा करत असताना हिंदुस्थानसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आणि अवघ्या 100 ग्रॅम वजनाने विनेश फोगाट हिला 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे.

यानंतर हिंदुस्थानात संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावर ऑलिम्पिक स्पर्धेवर बहिष्कार घालण्यात यावा अशी मागणी होऊ लागली. या घटनेचे पडसाद लोकसभेत उमटले. लोकसभेत मोठा गदारोळ झाला. विरोधी पक्षांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. क्रीडामंत्री जबाव दो… अशा घोषणा लोकसभेत देण्यात आल्या. आता या प्रकरणी केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया दुपारी 3 वाजता निवेदन दिले.

मनसुख मांडविया म्हणाले की, ‘आज विनेश फोगाटचे वजन 50 किलो 100 ग्रॅम आढळले आणि तिला अपात्र ठरवण्यात आले. हिंदुस्थान ऑलिम्पिक संघटनेने युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) कडे तीव्र निषेध नोंदवला आहे. आयओएच्या अध्यक्षा पीटी उषा पॅरिसमध्ये आहेत, पंतप्रधानांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना आवश्यक कारवाई करण्यास सांगितले… सरकारने त्यांना वैयक्तिक कर्मचाऱ्यांसह सर्व सुविधा पुरविल्या आहेत.’