‘इंडिया हाऊस’ हे ऑलिम्पिक चळवळीतील हिंदुस्थानची प्रगती प्रतिबिंबित करेल : नीता एम. अंबानी

पुढील महिन्यात होणाऱ्या ‘Paris Olympic 2024’मध्ये अनेक ऐतिहासिक घटना आणि विक्रम पाहायला मिळतील. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये Reliance Foundation हे Indian Olympic Association (IOA) च्या भागिदारीत ‘India House’ची स्थापणा करणार आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंना घरच्यांची उणीव भासू नये तसेच प्रत्येत विजेत्याला पदक जिंकण्याचा आनंद साजरा करुण देण्याच्या उद्देशाने इंडिया हाऊसची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळेच देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी जाणाऱ्या हिंदुस्थानी खेळाडूंचे हे एक प्रकारे दुसरे घर असणार आहे. खेळाडूंसाठी महत्वाचे असणारे हे हाऊस ऑलिंम्पिक गेम्समधली देशातील पहिले हाऊस असणार आहे. 2024 च्या संपूर्ण समरमध्ये ‘पार्क ऑफ नेशन्स’ म्हणून कार्यरत असलेल्या प्रतिष्ठित पार्क डे ला व्हिलेटमध्ये स्थित इंडिया हाऊस हे फ्रान्स, नेदरलँड्स, कॅनडा, ब्राझील आणि यजमान देश पॅरिस यांसारख्या जगभरातील 14 देशांच्या हाऊसपैकी एक असेल. या हाऊसमध्ये खेळाडूंना संस्कृती ते कला आणि क्रीडा ते योग, हस्तकला, संगीत यांचा अनुभव घेता येणार आहे.