Paris Olympic 2024 – श्रीजा अकुलाचे ऑलिम्पिकमध्ये विजयी पदार्पण

हिंदुस्थानची महिला टेबल टेनिसपटू श्रीजा अकुला हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विजयी पदार्पण केले. तिने सलामीच्या लढतीत स्वीडनच्या ख्रिस्टीना कालबर्ग हिचा 4-0 (11-4, 11-9, 11-7, 11-8) असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली. श्रीजाला फक्त दुसऱया फेरीत संघर्ष करावा लागला. या फेरीत 9-9 अशा बरोबरीनंतर श्रीजाने विजय मिळवला व परत स्वीडीश खेळाडूला फारशी संधी दिली नाही.