परळी जवळ असलेल्या नंदगौळ रस्त्यावर असलेल्या कचरा डेपोसमोरच्या रस्त्यावर अंदाजे तीन दिवसांचे असलेले स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री 9.30 च्या सुमारास सदरील घटना उघडकीस आली. 72 तासात ही दुसरी घटना आहे. याआधी 8 महिन्याची मुलगी आढळली होती.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे नारायण गित्ते, पोलीस सहनिरीक्षक गणेश झांबरे उपनिरीक्षक, तुळशीराम परतवाड, व्यंकट डोरनाळे, महादेव वाघमारे यांनी तातडीने या मुलीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्या असून अर्भकावर पुढील उपचार सुरू आहेत. अर्भक लाल कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत सापडले असून ते अंदाजे तीन दिवसाचे असल्याची माहिती समोर आली आहे.