Viral Video : वारीतील ‘तो’ व्हिडीओ जुना; अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांचे आवाहन

सोशल मीडियावर दररोज काहीनाकाही व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक पंढरपूर वारीतला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पंढरपूर येथे निघालेल्या दिंडीतील भजनी मंडळींना भजन करू दिले नाही, अशा आशयाचा तो व्हिडीओ आहे. या व्हिडीओमुळे उलट सुलट चर्चांना उधान आले होते. परंतु या व्हिडीओ संदर्भात राहुरी पोलीस स्टेशनने स्पष्टीकरण देत हा व्हिडीओ 2013 मधील असल्याचे सांगितले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पंढरपूर वारीतला व्हिडीओ सन 2013 मधीन नोव्हेंबर महिन्यातला आहे. सदर घटना घडली तेव्हा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली होती. याबाबत राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ठेंगे यांनी माहिती दिली, काल दिनांक 4 जुलै रोजी राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतून पंढरपूर येथे निघालेल्या दिंडीतील भजनी मंडळींना भजन करू दिले नाही. अशा आशयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. सदर बाब ही संपूर्णतःअफवा आहे. सदरच्या व्हिडीओची शहानिशा केली असता सदरचा व्हिडीओ हा सन 2023 मधील नोव्हेंबर महिन्यातील आहे. झालेल्या प्रकारा बद्दल त्याच वेळी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.” असे पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी सांगितले.

“तसेच ज्या ज्या व्हाट्सअप ग्रुप वर सदरचा जुना व्हिडिओ टाकून खोटी अफवा पसरवण्यात आली होती. त्या ग्रुपच्या एडमिन व व्हिडीओ सेंड करणाऱ्या व्यक्तींना समज देऊन सदरचा व्हिडिओ डिलीट करण्यात आला आहे. सदरचा व्हिडिओ हा जुना असल्याने नागरिकांनी तसेच वारकरी बंधू भगिनी कोणीही त्यावर विश्वास ठेवू नये.” असे आवाहन पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी केले आहे.