Photo : वारकऱ्यांच्या स्वागतासाठी अलंकापुरी सज्ज..

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पायी वारी साठी आळंदी मंदिरातून 29 जून रोजी तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे देहू मंदिरातून 28 जून रोजी लाखो भाविक, नागरिकांचे उपस्थितीत प्रस्थान हरिनाम गजरात होणार आहे.

यासाठी देहू आणि आळंदी नगरपरिषदेने भाविकांना सेवा सुविधा देण्यास कंबर कसली आहे. याचबरोबर देहू आळंदीत प्रभावी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत आळंदीत मोठ मोठ्या प्रमाणात भविकाक,नागरिकांसह तीर्थक्षेत्र देहू आळंदी मंदिर परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहे.

आळंदीत पब्लिक ॲड्रेस सिस्टीम कार्यरत करण्यात आली असून संपूर्ण आळंदीत ध्वनिक्षेपक यंत्रणेच्या माध्यमातून भाविक, नागरिक यांस यात्रा पालखी सोहळा प्रस्थान काळात सूचना देण्यात येत आहेत.

ठीकठिकाणी चौकात ध्वनिक्षेपक यंत्रणा लावण्यात आली असून आळंदीतील पोलीस नियंत्रण कक्षातून संपूर्ण प्रस्थान सोहळ्यावर सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्यात येत आहे. यासाठी आळंदी पोलिसांनी प्रभावी उपास्य योजना करीत परिश्रम पूर्वक काम केले आहे.