
दुसऱ्या मुलाशी व्हॉट्सअपवर बोलत असल्याच्या संशयातून प्रियकराने प्रेयसीवर चाकूहल्ला केल्याची घटना विरारमध्ये घडली. तरुणीच्या हातावर, मनगटावर वार करण्यात आले असून, तिचा जबडाही फ्रॅक्चर झाला आहे. तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. अक्षय जनार्दन पाटील असे आरोपीचे नाव आहे.
अक्षय आणि पीडित तरुणीचे प्रेमसंबंध होते. दोघांचे लग्नही ठरले होते. मात्र प्रेयसी दुसऱ्या मुलाशी व्हॉट्सअपवर बोलते असा अक्षयला संशय होता. या संशयातून त्याने तरुणी काम करत असलेल्या मेडिकल स्टोर्समध्ये जाऊन तिच्यावर चाकूने हल्ला केला. तसेच जबड्यावर लाथ मारून फ्रॅक्चर केला.
प्रेयसीवर हल्ला केल्यानंतर आरोपीने तिच्या आईला फोन करून मुलीला मारून टाकल्याचे सांगितले. यानंतर तरुणीच्या वडिलांनी मेडिकल स्टोर्समध्ये येऊन पाहिले असता ती रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.