युनेस्कोच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाकिस्तानचा विजय

संयुक्त राष्ट्रच्या (युनेस्को) कार्यकारी मंडळाच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाकिस्तानने बलाढय़ हिंदुस्थानचा दारुण पराभव केला आहे. 58 सदस्य असलेल्या देशांपैकी या निवडणुकीत पाकिस्तानच्या बाजूने 38 मते पडली तर हिंदुस्थानला अवघी 18 मते मिळाली आहेत.

संयुक्त राष्ट्राच्या (युनेस्को) संबंधित शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या कार्यकारी बोर्डाच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. या निवडणुकीत पाकिस्तानने मोठय़ा फरकाने विजय मिळवला आहे. युनेस्कोच्या संचालक मंडळात उपाध्यक्षाची मोठी भूमिका असते. युनेस्कोच्या कार्यकारी बोर्डाची फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये बैठक झाली, त्यानंतर मतदान पार पडले. गेल्या 70 वर्षात संयुक्त राष्ट्रात हिंदुस्थानचे वजन वाढले. परंतु, पेंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून विश्वगुरू असल्याची टिमकी मिरवणाऱया मोदी सरकारला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.