पद्मिनी कोल्हापुरे होणार आजी

पद्मिनी कोल्हापुरे या हिंदी चित्रपटजगतातील प्रसिद्ध अभिनेत्री. बॉलिवुडमधील अभिनेत्री व त्यांची भाची श्रद्धा कपूरसोबतचे त्यांचे फोटो आपण नेहमीच पाहात असतो. नुकताच पद्मिनी कोल्हापुरे यांच्या घरी एक सुखद सोहळा साजरा झाला. पद्मिनी कोल्हापुरे यांच्या सुनेच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. मुलगा प्रियांक शर्मा व सून शाझा मोरानी यांच्या आयुष्यातील या खास दिवसाचा आनंद होणाऱया आजी पद्मिनी कोल्हापुरे यांच्या चेहऱयावर दिसत होता. डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाला श्रद्धा कपूर खास पारंपरिक मराठमोळ्या अंदाजात आली होती. लिंबू कलरचा ड्रेस, त्याला साजेसे कानातले व मोत्याची नथ असा साज केल्याने ती अधिकच सुंदर दिसत होती.