आदित्य ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

फुलांचा दरवळ, आनंदाची मांदियाळी

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’ परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. उभारण्यात आलेला मंडपही फुलांनी सजविण्यात आला होता. त्यामुळे फुलांचा दरवळ आणि आनंदाची मांदियाळी असेच मनोहारी चित्र निर्माण झाले होते. शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ‘मातोश्री’च्या द्वारावरच छोटेखानी स्टेज उभारण्यात आला होता.

शीख बांधवांनी बांधली पगडी

शीव-कोळीवाडा तसेच मुलुंडमधून शीख बांधवांनी आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देताना भगव्या  रंगाची पगडी बांधली आणि तलवार भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव गुरुज्योतसिंग तसेच माजी नगरसेवक जसबिरसिंग भिरा यांच्यासह अनेक शीख बांधवांनी आदित्य ठाकरेंना शुभेच्छा दिल्या.

चित्र, सही आणि आनंद

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहिसरमधील सुजल वारंग या विद्यार्थ्याने कागदावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे चित्र स्वतः रेखाटले होते. हे चित्र पाहून आदित्य ठाकरे यांनी त्याचे काwतुक केले आणि चित्रावर स्वतःची स्वाक्षरी केली. यामुळे सुजल वारंग खूश झाला. आदित्य ठाकरेंची सही असलेले चित्र मी आता जपून ठेवणार असल्याचे म्हणाला.

राम मंदिराची प्र्रतिकृती भेट

उपनेते माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांनी आदित्य ठाकरे यांना अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती भेट दिली. कलाकुसरीतून साकारलेल्या मंदिराची प्रतिकृती पाहून आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले.

मुस्लिम बांधवांकडून तलवार भेट

डोंगरी परिसरातून जमात उलेमा ई मुंबईचे मौलाना सिराज खान, ज्युजल जावेदवाला, फारुख कुरेशी, आरिफ मन्सुरी यांच्यासह इतर मुस्लिम बांधवांनी आदित्य ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आणि तलवार भेट दिली. ख्रिश्चन धर्मगुरूंनी आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

मान्यवरांच्या शुभेच्छा

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, माजी खासदार विनायक राऊत, राजन विचारे, चंद्रकांत खैरे, शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, आमदार सुनील राऊत, विभागप्रमुख महेश सावंत, आशीष चेंबूरकर, प्रमोद शिंदे, उपनेते सचिन अहिर, राजकुमार बाफना, सुषमा अंधारे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, बबन पाटील, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना व युवासेना सचिव वरुण सरदेसाई, साईनाथ दुर्गे, पवन जाधव, प्रदीप सावंत, माजी नगरसेवक प्रकाश आयरे, अनिल कोकीळ, संजय घाडी, संजना घाडी, योगेश भोईर, माधुरी भोईर, आमदार विलास पोतनीस, रमेश कोरगावकर, ऋतुजा लटके, खासदार प्रियांका चतुर्वेदी, चंद्रहार पाटील, अमोल कीर्तिकर, केदार दिघे, अशोक धात्रक, शशिकांत झोरे, श्रद्धा जाधव, बाळा नर यांच्यासह हजारो शिवसैनिक आणि पदाधिकाऱयांनी आदित्य ठाकरे यांचे अभीष्टचिंतन केले.

शेकडो कामगारांनी केले अभीष्टचिंतन

भारतीय कामगार सेनेचे तसेच इंडियो एअरवेज युनिटचे सदस्य मोठय़ा संख्येने आदित्य ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. शुभेच्छा दिल्यावर या सर्वांनी ‘आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या.