ओमेगा एंटरप्रायझेसमधील कामगारांना घसघशीत पगारवाढ; भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांना मोठे यश

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहार कार्गो, मुंबई येथील ओमेगा एंटरप्रायझेस पंपनीतील इम्पोर्ट आणि एक्स्पोर्ट विभागातील कामगारांचा भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नामुळे एप्रिल 2024 ते मार्च 2027 या तीन वर्षांकरिता 5800 रुपये पगारवाढीचा करार करण्यात आला. या करारामुळे महागाईने त्रस्त झालेल्या कामगारांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असून त्यांनी भारतीय कामगार सेनेचे आभार मानले आहेत.

भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते -खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी यांचे मार्गदर्शन तसेच संयुक्त सरचिटणीस संजय शंकर कदम व त्यांच्या सहकाऱयांच्या अथक मेहनतीमुळे हा पगारवाढीचा करार संपन्न झाला. पगारवाढीच्या करारावर संयुक्त सरचिटणीस संजय कदम, व्यवस्थापनाकडून पैचमुत्तु तेवर, सहचिटणीस विजय शिर्पे, संजीव राऊत, युनिटच्या सर्व कमिटी सदस्यांनी सह्या केल्या. ओमेगा एंटरप्रायझेस पंपनीमधील कमिटीचे अध्यक्ष विजय गोसावी, सदस्य महेंद्र सुर्वे, अनिल कानडे, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, संदीप केणी, जोकिंम डिसिल्वा, अमित मोहिते, नितीन सावंत, कार्यकारिणी सदस्य शिवप्रसाद ठाकूर, श्रीकांत घाग, संकेत बामणे, आरसा कुमार काशी, कामराज नाडर आणि कामगार यावेळी उपस्थित होते.

पगारवाढीसोबत वैयक्तिक आणि अपघात विमा
घसघशीत पगारवाढीव्यतिरिक्त कामगारांना 18 पीएल देण्यात आल्या असून डी.ए. ओपन ठेवला आहे. महत्त्वाचे म्हणजे कामगारांसाठी 5 लाखांचा वैयक्तिक विमा तसेच 10 लाखांच्या अपघात विम्याचीदेखील व्यवस्था केली आहे.