जपानच्या निहॉन हिदानक्यो संस्थेला शांततेचा ’नोबेल‘

जग अण्वस्त्र मुक्त व्हावे यासाठी मोठे कार्य करणाऱया जपानच्या निहॉन हिदानक्यो संस्थेला या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

नोबेल समितीने आज या पुरस्काराची घोषणा केली. दुसऱया महायुद्धावेळी अमेरिकेने 6 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर अणुबॉम्ब टाकला होता. त्यात एक लाखांवर नागरिकांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांना कायमचे अपंगत्व आले. या अणुबॉम्ब हल्ल्यात जे बचावले त्यांचे पुर्नवसन करण्यासाठी निहॉन हिदानक्यो ही संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेने अणुबॉम्ब पीडितांसाठी मोठे काम केले आहे. जग हे अणवस्त्र मुक्त व्हावे यासाठीही संस्था काम करते. त्यांच्या या कामाचा गौरव करण्यासाठी अत्यंत प्रतिष्ठsचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.