Nobel Peace Prize 2024 – जपानची संस्था ‘निहॉन हिदानक्यो’ला शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर

जगातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जाणारा नोबेल पुरस्काराची घोषणा झाली आहे. यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  निहॉन हिदानक्यो या जपानच्या संस्थेला घोषित करण्यात आला आहे.

जपानची संस्था निहॉन हिदानक्योची स्थापना 1956 मध्ये झाली. हिरोशिमा आणि नागासाकीतील अणुबॉम्ब पीडितांसाठी या संस्थेने मोठे काम केले आहे. जग अण्वस्त्रमुक्त व्हावे, यासाठी ही संस्था कार्य करते. त्या कार्याचा गौरव करण्यासाठी यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जपानच्या या संस्थेला घोषित करण्यात आला आहे.

दुसरीकडे, या आठवड्यात वैद्यकीय क्षेत्रातल्या नोबेलची घोषणा करण्यात आली. त्यासाठी व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले. यानंतर शांततेच्या नोबेल पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली. त्यानुसार यंदाचा हा शांततेचा नोबेल पुरस्कार जपानची संस्था निहॉन हिदानक्योला पुरस्कार देण्यात येणार आहे.