पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत प्रचार सभा घेऊ नये अशी गळ अजित पवार यांनी घातली आहे. मोदींनी इतर विधानसभा मतदारसंघात सभा घ्याव्यात असेही पवार म्हणाले.
बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची गरज नाही असे अजित पवार म्हणाले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना पवार म्हणाले की बारामतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची गरज नाही, त्यांच्या सभांची गरज इतर विधानसभा मतदारसंघात आहे असे म्हणाले.
टीव्ही 9 मराठीशी बोलताना ही लढाई परिवारातली आहे असे अजित पवार म्हणाले. बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार का या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की या ठिकाणी होणारी लढत ही परिवारातली आहे. असे म्हणत मोदींची सभा होणार नाही असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.