राजाने विरोधी विचार सहन केले पाहिजेत! गडकरींनी कान टोचले

लोकशाहीची सर्वात मोठी परीक्षा जर कोणती असेल तर राजाच्या विरुद्ध कितीही प्रखरपणे जर कुणी विचार मांडले तरीही राजाने ते सहन केले पाहिजेत. त्या विचारांवर चिंतन केले पाहिजे. हीच खरी लोकशाहीमध्ये अपेक्षा आहे, अशा शब्दांत भाजप नेते व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सत्ताधाऱ्यांचे कान टोचले. देशहितासाठी योग्य ते मांडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिले आहे, असे गडकरी म्हणाले.