भाजप नेते नितीन गडकरी यांनी लाडकी बहीण योजनेवरून केलेले विधान चर्चेत

भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लाडकी बहीण योजनेवरून केलेले विधान चर्चेत आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या राज्यातील आपल्याच सरकारचे नितीन गडकरी यांनी कान टोचले आहेत.

उद्योजकांनी उद्योगापासून शासनाला दूर ठेवले पाहिजे. शासन ही विषकन्या असते. कुठल्याही पक्षाची असली तरी ज्याच्या भरोशावर असते त्याला उद्ध्वस्त करते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका. सध्या अनुदानाचे पैसे मिळतील का? याची शाश्वती नाही. कारण लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागत आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. टीव्ही 9 मराठीने हे वृत्त दिले आहे.

विदर्भात मोठी गुंतवणूक आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून कोणी हाती लागत नसल्याची खंतही नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. 500 हजार कोटीची गुंतवणूक करायला कोणी तयार नाही. विदर्भात मिहान सारखे प्रकल्प आणले. उद्योजक जमिनी विकत घेतात. मात्र, युनिट सुरू करत नाही, असे नितीन गडकरी पुढे म्हणाले.