फाइल्सवर अधिक वजन ठेवले तर… नितीन गडकरी यांच्याकडून सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराची कबूली

”आमच्या सिस्टममध्ये काही ‘न्यूटनचे वडील’ आहेत. जर तुम्ही फाइल्सवर अधिक वजन ठेवले (पैसे) तर फाइल्स वेगाने पुढे जाते”, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी यंत्रणेत फोफावलेल्या भ्रष्टाचाराची कबूली एका जाहीर कार्यक्रमात दिली आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या माजी विद्यार्थी संघटनेने आयोजित केलेल्या ‘इंजिनिअर डे’ कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

”आजच्या दिवशी मी हे बोलायला नको. पण जिथे तुम्हाला पैसे जास्त मिळतात तिथे तुम्ही अधिक वेगाने काम करता. अन्यथा करत नाही. आमच्या सिस्टममध्ये काही ‘न्यूटनचे वडील’ आहेत. जर तुम्ही फाइल्सवर अधिक वजन ठेवले (पैसे) तर फाइल्स वेगाने पुढे जाते. माझ्या या बोलण्यावर लोक म्हणतील की मी फार कठोर बोलतोय. पण माझी अपेक्षा आहे की किमान तरुणांनी यातून धडा शिकावा”, असे गडकरी म्हणाले.