Nagar News – महानगरपालिकेच्या वतीने डासमुक्त जनजागृती अभियानाचा नववा रविवार, डास उत्पत्तीचे पाणीसाठे आयुक्तांनी केले नष्ट

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की संसर्गजन्य आजारांची साथ सुरू होते. प्रामुख्याने यामध्ये डेंगू, मलेरिया, झिका, हिवताप या आजारांमुळे नागरिक त्रस्त होतात. त्यामुळेच नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून विविध उपयोजना राबविल्या जात आहेत.

बहुतांश प्रमाणात डेंगू आजारावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झालो आहोत. डेंगूची एडिस जातीची अळी ही स्वच्छ पाण्यात निर्माण होत असून यातून डासाची निर्मिती होत असते. हे होऊ नये यासाठी आज 9 व्या आठवड्या निमित्त केडगाव देवी परिसरामध्ये नागरिकांच्या घरोघरी जाऊन स्वच्छ पाण्याच्या साठ्यांची तपासणी केली असून ज्या ठिकाणी अळी डासाची निर्मिती झालेली दिसली त्या परिसरातील डास उत्पत्तीचे पाणीसाठे नष्ट करण्यात आले आहेत, असे प्रतिपादन मनपायुक्त यशवंत डांगे यांनी केले.

केडगाव देवी परिसरातील डास उत्पत्तीचे पाणी साठे आयुक्त यशवंत डांगे यांनी पाहणी करून नष्ट केले, यावेळी मनपाआरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, माजी मनपा महिला बालकल्याण, समिती सभापती लताताई शेळके, केडगाव आरोग्य अधिकारी डॉक्टर गिरीश दळवी, वैभव कदम, सोपान कोतकर, साहेबराव कोतकर, रवींद्र कोतकर, डॉक्टर कुणाल जाधव, डॉक्टर ओंकार कुंभारे, आदी सह मनपा अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने नगर शहरांमध्ये आयुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शना खाली डेंगू मुक्त अभियान राबवले जात असून आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी नागरिकांच्या घरोघरी जाऊन जनजागृती करत आहे. त्यामुळे केडगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याची माहिती, मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी केले.

महापालिकेचे आरोग्य कर्मचारी, अशा सेविका शहरातील विविध भागात जाऊन पाणी साठ्याची तपासणी करत डासाची निर्मिती होणारे साठे नष्ट केले. त्यामुळे डेंगू मुक्त अभियानाला यश आले आहे. राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना व्हावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती केली जात असून नागरिकांनी देखील त्यांचा लाभ घ्यावा, असे आव्हान मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.