देश आणि राज्याप्रमाणेच नगर जिल्ह्यातही महाविकास आघाडीने भाजप महायुतीला मोठा धक्का दिला आहे. नगर दक्षिणमधून मिळालेल्या विजयानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना, ‘आता मी दिल्लीला जाऊन इंग्रजीत भाषण करणार आहे,’ असा टोला लगावत नीलेश लंके यांनी सुजय विखे यांच्या टीकेला उत्तर दिले.
माध्यामांशी संवाद साधताना नीलेश लंके म्हणाले, ‘सर्वसामान्य जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकलाय, तो सार्थ ठरविण्यासाठी पुढील पाच वर्षे त्यांचा सेवक म्हणून काम करणार आहे. पुढील पाच वर्षांमध्ये शेतकरी सुखी झाला पाहिजे, बेरोजगारांना रोजगार आणि माझ्या मतदारसंघात पाणी मिळाले पाहिजे यासाठी मी उद्यापासूनच कामाला लागणार आहे.’ दरम्यान, ‘संसदेत इंग्रजी बोलावे लागणार,’ या सुजय विखेंच्या टिप्पणीचा लंपेंनी आपल्या शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, ‘आता मी दिल्लीत जाऊन इंग्रजीत भाषण करणार असे लंके म्हणाले.