व्हॉट्सअॅप ग्रुपवरची चॅटिंग आता आणखी मजेशीर

व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी एक नवीन फिचर आणले आहे. या नव्या फिचरमुळे ग्रुप चॅटिंग आता अधिक रंजक आणि मजेदार होणार आहे. हे फिचर ग्रुप चॅट्समध्ये ईव्हेंट क्रिएट करण्याचा ऑप्शन देणार आहे. हे फिचर केवळ कम्युनिटी चॅट्ससाठीच होते मात्र व्हॉट्सअॅपने नियमित ग्रुप चॅटिंगसाठीही हे फिचर आणले आहे.

व्हॉट्सअॅपचे हे फिचर युजर्सचे ग्रुप चॅटींग आधीपेक्षा खूपच उत्तम बनविणार आहे. व्हॉट्सअॅपने या फिचरचा एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. याच्या मदतीने युजर्स ग्रुप चॅटमध्ये ईव्हेंट क्रिएट करू शकतात. ईव्हेंटसाठी नाव, डिस्क्रिप्शन, तारीख, लोकेशन भरता येणार आहे. याशिवाय ईव्हेंटसाठी इतर ग्रुप सदस्यांना वॉईस आणि व्हिडीओ कॉलसाठी नोटीफाय करता येणार आहे.

ऍन्ड टू ऍन्ड एन्क्रिप्शनसोबत नवे फिचर
ईव्हेंट क्रिएटर झाल्यानंतर ग्रुपचे अन्य सदस्य ईव्हेटला व्हूज आणि एक्सेप्ट करू शकतात. क्रिएटर थोडय़ा वेळानंतरही ईव्हेंटची माहिती अपडेट करू शकते. व्हॉट्सअॅपने या नव्या फिचर्समध्ये युजर्सच्या सेफ्टीची जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी व्हॉट्सअॅप ऍन्ड टू ऍन्ड एन्क्रिप्शनसोबत देत आहे. याचाच अर्थ ईव्हेट फक्त ग्रुप सदस्यच पाहू शकतात. WABetaInfo ने हे फीचर व्हॉट्सअॅप बीटा फॉर अॅड्राईड 2.24.14.9 मध्ये पाहिले आहे. हे फिचर स्टेबल व्हर्जनमध्येही दिसणार आहे.