नीटच्या टॉपरने उचलले टोकाचे पाऊल, कॉलेज हॉस्टेलमध्ये सापडला भयंकर अवस्थेत

पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यातील एका एमडीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तो दिल्लीच्या मौलाना आझाद मेडीकल कॉलेजमध्ये पीजी करत होता. रविवारी सकाळी त्या तरुणाचा मृतदेह पारसी अंजुमन गेस्ट हाऊसमध्ये मिळाला. त्याच्या आत्महत्येच्या वृत्ताने सगळीकडे एकच खळबळ उडाली. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपविण्यात आला.

नवदीपने 2017च्या नीट यूजीच्या परिक्षेत देशात टॉप केले होते. तो रेडिओलॉजीमध्ये पीजीचे शिक्षण घेत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवदीपचे वडिल त्याला फोन करत होते. अनेकदा फोन करूनही तो उचलत नसल्याने त्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी त्याच्या मित्राला जाऊन पाहायला सांगितले. मित्राने पाहिले तर नवदीपची खोली बंद होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात नवदीपने आत्महत्या केली आहे. मात्र या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळावरुन कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही.

जून 2017 मध्ये ज्यावेळी नीटचा निकाल आला. त्यावेळी मुक्तसरमध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले होते. नवदीप सिंहने ऑल इंडिया फर्स्ट रॅंक मिळवला होता. तर बारावीच्या परिक्षेत त्याने 88 टक्के मिळवले होते. त्याचे वडिल गोपाल सिंह सरायनागा गावात सरकारी सिनिअर सेकेंडरी शाळेत मुख्याध्यापक आहेत. नवदीपला डॉक्टर व्हायचे होते.