परीक्षा पे चर्चा करणारे पंतप्रधान मोदी NEET घोटाळ्यावर गप्प का? काँग्रेस आक्रमक, CBI चौकशीची मागणी

pm-modi-jacket

NEET 2024 परीक्षेच्या निकालात मोठा घोटाळा झाला आहे. अखेर या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आहे. ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेतील घोटाळ्यावरून संपूर्ण देशात विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही हा मुद्दा उचलून धरला आहे. आता काँग्रसने या प्रकरणी CBI चौकशीची मागणी केली आहे.

NEET परीक्षेतील घोटाळाप्ररकणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सरकार या प्रकरणी गंभीर आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. या प्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली असून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर पलटवार केला आहे. काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

चौकशी केलीच नाही आणि निकालही देऊन टाकला. सरकारी अधिकाऱ्यांना विचारल्यावर सर्वकाही ठीक आहे, असेच उत्तर त्यांना मिळेल. तुम्ही या निर्णयावर आलात कसे? हे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना जाणून घेण्याच अधिकार आहे. पंतप्रधान गप्प आहेत आणि चौकशी न करताच काहीच झाले नसल्याचे शिक्षणमंत्री सांगत आहेत. लोकसभा निवडणुकीत जनतेने नाकरल्यानंतरही यांचा अहंकार कायम आहे. या प्रकरणाची CBI चौकशी झालीच पाहिजे, असे गौरव गोगोई म्हणाले.

शिक्षणंत्री, पंतप्रधान मूग गिळून गप्प आहेत. ज्या NTA च्या देखरेखीखाली पेपरी फुटला त्यांनाच चौकशी करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. आम्हाला निष्पक्ष चौकशी हवी आहे. कोचिंग क्लासेसचे नेक्सस मध्यम वर्गीय कुटुंबीयांचे जीवन अस्थिर करत आहे. या घोटाळ्यात नक्कीच NTA चा एखादा अधिकारी सामील आहे, असा आरोप गोगोई यांनी केला.

पंतप्रधान मोदी परीक्षेवर चर्चा करत होते. परीक्षेवर मार्गदर्शन करत होते. आता जो घोटाळा झाला आहे त्यावर ते का चर्चा करत नाहीत? या प्रकरणी सीबीआस चौकशी झालीच पाहिजे, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे गौरवर गोगोई यांनी सांगितले. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी. आम्ही या प्रकरणी रेकॉर्डींग ऐकली आहे. त्यात लाखो रुपयांची मागणी करण्यात आली आहे. ही परीक्षा भविष्यातील डॉक्टर तयार करते. मग त्यांना काहीही न करताच तयार केले जात आहेत, असे काँग्रेस नेते गौरव गोगोई म्हणाले.