‘फोन पे’ने खाल्ले अर्धे यूपीआय मार्केट, गुगल पे, पेटीएम फेल

देशात अर्ध्यातून अधिक यूपीआय मार्केटवर फोन पेने कब्जा केल्याचे उघड झाले आहे. गुगल पे आणि पेटीएमलाही फोन पेने मागे टाकले आहे. ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने याबाबत आकडे जारी केले आहेत. फोन पे ही अमेरिकेतील वॉलमार्टची कंपनी आहे. या कंपनीचा हिंदुस्थानात गुगल पे आणि पेटीएमसोबत मुकाबला आहे. गुगल पेदेखील अमेरिकन कंपनी आहे, तर पेटीएम हिंदुस्थानी कंपनी आहे. दरम्यान, आरबीआयच्या निर्बंधांनंतर पेटीएम यूपीआय मार्केट डाऊन झाले आहे.

‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने ऑगस्टमध्ये जारी केलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये एकूण 20,60,735.57 कोटी रुपयांचे व्यवहार झाले. यात फोन पेचा वाटा 10,33,264.34 कोटी रुपयांचा होता. या आकेडावारीनुसार आर्थिक व्यवहार पाहिले तर फोन पेची यूपीआय मार्केटमधील भागीदारी तब्बल 48.35 टक्के इतकी आहे, तर यूपीआय पेमेंटच्या किमतीनुसार मार्केटमधील वाटा 50.14 टक्के इतका आहे.

ऑगस्टमध्ये कुणाचा किती वाटा (कोटींमध्ये)

n फोन पे- 10,33,264.34

n गुगल पे- 7,42,223.07

n पेटीएम- 1,13,672.16

कुणाचे किती मार्केट (टक्क्यांमध्ये)

n फोन पे- 48.39

n गुगल पे-37.3

n पेटीएम-7.21

2026 पर्यंत रोज 1 बिलियन यूपीआय पेमेंटची आशा

ऑगस्टमध्ये फोन पे आणि गुगल पेच्या यूपीआय पेमेंटमध्ये वाढ दिसली. पेटीएमच्या यूपीआय पेमेंटमध्ये मात्र घसरण दिसली. यूपीआयच्या माध्यमातून रोज 500 मिलियन व्यवहार होत आहे. हे लक्षात घेतले तर 2026-27 पर्यंत रोज एक बिलियन यूपीआय व्यवहार होण्याची आशा आहे.