
नदीच्या प्रवाहात व्हॉलीबॉल खेळताना तोल गेल्याने सहा तरुण पाण्यात बुडाल्याची घटना पटनामध्ये घडली. कलेक्टर घाटापासन सुमारे तीन किमी अंतरावर ही घटना घडली. सर्वजण नदीवर अंघोळीसाठी नदीवर गेले होते. तरुणांना बुडताना पाहून स्थानिकांनी धाव घेत वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न अयशस्वी झाला.
सर्व तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते आणि नदीवर अंघोळीसाठी गेले होते. यादरम्यान सर्व जण व्हॉलीबॉल खेळत होते. यावेळी तोल जाऊन एक जण बुडू लागला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नान बाकीचेही बुडाले.
तरुणांना बुडताना पाहून स्थानिकांनी धाव घेतली. मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. सहाही तरुण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. दोघांचे मृतदेह बाहेर काढले असून अन्य चौघे अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता तरुणांचा शोध सुरू आहे. मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.