हेच काय नरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल? व्हिडीओ शेअर करत काँग्रेसची कडाडून टीका

लोकसभा निवडणुकीत जनतेला भाजपला चांगलाच दणका दिला आहे. गुजरात मॉडेलची जाहिरात करत 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आले होते. त्यानंतर सातत्याने गुजरात मॉडेलचा डंका पिटण्यात येत होता. आता काँग्रेसने गुजरातमध्ली एक व्हिडीओ शेअर करत गुजरात मॉडेलची हवाच काढून टाकली आहे. हा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसने नरेंद्र मोदींच्या गुजरात मॉडेलवर सडकून टीका केली आहे.

काँग्रेसने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, गुजरातमधील भरुच येथील एका हॉटेलमध्ये नोकरीसाठी भरती होती. त्यासाठी मोठ्या संख्येने बेरोजगारांची गर्दी झाली होती. बेरोजगार तरुणांची गर्दी वाढतच होती. गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली की गर्दीमुळे हॉटेलसमोरील रेलिंगच कोसळली. त्यामुळे अनेक तरुण खाली पडले. असा व्हिडीओ काँग्रेसने शेअर करत हेच काय नरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल आहे, असा सवाल काँग्रेसने केला आहे. अशा प्रकारचे बेजरोजगारीचे मॉडेल मोदी देशावर लादत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

देशात सर्वत्र बेरोजगारांची संख्या वाढत आहे. तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले होते. मात्र, ते आश्वासन पूर्ण करण्यात मोदी सरकार सपसेल अपयशी ठरले. त्यामुळे देशात बेरोजगारी वाढत आहे. ही समस्या किती बिकट झाली आहे, ते या व्हिडीओमधून दिसून येत आहे.