22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मंदिराचे लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्यानिमित्ताने जोरदार तयारी सुरू असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मात्र या सोहळय़ावर चार प्रमुख मठांच्या शंकराचार्यांनी बहिष्कार टाकला आहे. अपूर्ण राम मंदिराचे उद्घाटन करणे चुकीचे आहे असे सांगत त्यांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला. त्यावरून भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. शंकाराचार्यांनी हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान सांगावं, असं वादग्रस्त वक्तव्य राणेंनी केले आहे.