नंदुरबारमध्ये दंगल; वाहनांची जाळपोळ

नंदुरबार शहरात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास मुस्लिम धर्मीयांचा जुलूस निघाला होता. धुळय़ातील दोंडाईचा येथील दगडफेकीच्या घटनेचे पडसाद नंदुरबारमध्ये उमटले. पाचच्या सुमारास माळीकाडा आणि इलाही चौक परिसरात अचानक दगडफेकीला सुरुकात झाली आणि दंगल उसळली. सायंकाळी सात वाजेपर्यंत येथे तणावपूर्ण स्थिती होती. यात जमावाने 7 ते 8 दुचाकी जाळल्या तसेच पोलीस अधिक्षकांच्या वाहनाकर दगडफेक केली. जवाकाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या.