मतदान होईपर्यंत मराठे चांगले होते, मतदान झाले की मराठे वाईट झाले!

मराठा समाजाने कधीही जातीयवाद केला नाही. पण मतदान होईपर्यंत मराठे चांगले होते आणि मतदान झाले की मराठे वाईट ठरले! हे कसे झाले? असा टोला मुंडेवाडी व्हायरल व्हिडीओवरून मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे. मराठा समाजाने शांत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. बीड जिल्हा संतांची भूमी आहे. बीड जिल्हय़ात असे कधीही झाले नाही. मराठा समाजाने कधीही जातीय राजकारण केले नाही. उलट सर्व समाजाला सोबत घेऊनच मराठा समाजाने राजकारण केले आहे, असे जरांगे म्हणाले. पण मतदान होईपर्यंत मराठे चांगले होते आणि मतदान संपले की मराठे वाईट झाले! हे कसे झाले? असा सवाल जरांगे यांनी केला.