राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाची उत्कृष्ट कामगिरी

37 व्या आंतर विद्यापीठीय राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट कामगिरी करत 7 सुवर्ण पदके, 4 रौप्य आणि 2 कास्य पदके जिंकली आहेत. या महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने एकूण 85 गुणांची कमाई केली आहे. या महोत्सवात देशातील 137 विद्यापीठे सहभागी झाली होती. मुंबई विद्यापीठाने संगीत विभागातून भारतीय शास्त्राrय तालवाद्य, पाश्चिमात्य एकल गायन, पाश्चिमात्य समूह गायन या स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले. तर भारतीय समूह गायन आणि पाश्चिमात्य वाद्यवृंद स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले आहे. नाटय़ विभागातील एकांकिका स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे. मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या रॅली या प्रकारात विद्यापीठास सुवर्ण पदकाचा बहुमान मिळाला आहे. या स्पर्धेचे यशस्वी नियोजन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील आणि सांस्कृतिक समन्वयक नीलेश सावे यांनी केले.