युवासेनेच्या इशाऱ्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरुंची ठाकूर कॉलेजला कारणे दाखवा नोटीस

उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवारी पियूष गोयल यांचा मुलगा ध्रुव गोयल याच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईतील ठाकूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जबरदस्ती करण्यात आली होती. रिक्षेच्या आदल्या दिवशी कॉलेजकडून विद्यार्थ्यांची ओळखपत्रे काढून घेण्यात आली होती व विद्यार्थ्यांना भाजप पुरस्कृत त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात आलेली. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. अनेकांनी त्यावरून भाजपवर टीका केली. या घटनेनंतर मुंबई विद्यापीठाने युवासेनेच्या इशाऱ्यानंतर ठाकूर कॉलेजला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या प्रकरणानंतर शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना माजी सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) रविंद्र कुळकर्णी यांची भेट घेऊन त्यांना याबाबत एक निवेदन दिले होते. यांची भेट घेत ठाकुर कॉलेजवर कारवाई करण्याची मागणी केली. या मागणीनंतर विद्यापीठाकडून ठाकूर कॉलेजला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच सभागृहात ज्या विद्यार्थ्यांनी या विरुद्ध आवाज उठवला त्यांच्यावर आकसाने कारवाई होणार नाही असे, कुलगुरु यांनी आश्वासन दिले.

तसेच महाविद्यालयांमध्ये सध्या नवीन मतदार नोंदणी व जनजागृती सुरू आहे. या कार्यक्रमांमध्ये राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्ती वा नेत्यांना प्रचारासाठी करून येऊ देऊ नये अशी मागणी देखील युवासेनेकडून करण्यात आली होती. ती मान्य करत कुलगुरूंनी तशा सूचना महाविद्यालयांना दिल्या आहेत.

याप्रसंगी युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर,शशिकांत झोरे,मिलिंद साटम, डॉ.धनराज कोहचाडे,कीसन सावंत,स्नेहा गवळी आणि शिवसेना उपनेत्या शितल शेठ देवरुखकर उपस्थित होते.

उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवारी पियूष गोयल यांचा मुलगा ध्रुव गोयल याच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईतील ठाकूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जबरदस्ती करण्यात आली होती. परिक्षेच्या आदल्या दिवशी कॉलेजकडून विद्यार्थ्यांची ओळखपत्रे काढून घेण्यात आली होती व विद्यार्थ्यांना भाजप पुरस्कृत त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात आलेली. दुसऱ्या दिवशी परिक्षा असताना नाईलाजाने विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहावे लागले. मात्र या कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थ्याने त्याची नाराजी बोलून दाखवली. त्या विद्यार्थ्याने ध्रुव गोयल यांना विचारलेल्या प्रश्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.