बोरिवली रेल्वे स्टेशनवर केबल तुटल्याने तांत्रिक समस्या निर्माण झाली असून पश्चिम रेल्वे मार्गावरील उपनगरीय लोकल ट्रेन सेवा सोमवारी सकाळी विस्कळीत झाली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बोरिवली हे मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्टेशनपैकी एक आहे आणि मोठ्या संख्येने प्रवासी आणि नोकरदारवर्ग दररोज लोकल सेवा वापरतात.
बोरिवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरून उपनगरीय गाड्या धावत नव्हत्या.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, स्टेशनवरील उर्वरित प्लॅटफॉर्मवरून – 3 ते 8 पर्यंत गाड्या चालवल्या जात होत्या.
बाधित पॉइंट्स क्लॅम्प केले जात आहेत आणि सेवा पूर्ववत करण्यासाठी प्राधान्याने काम सुरू आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे.
पश्चिम रेल्वे दररोज 1,300 हून अधिक उपनगरीय सेवा चालवते आणि दक्षिण मुंबईतील चर्चगेट आणि शेजारच्या पालघर जिल्ह्यातील डहाणू दरम्यान पसरलेल्या नेटवर्कवर सुमारे 30 लाख प्रवासी प्रवास करतात.