नव्या वर्षात म्हणजे सोमवारपासून मुंबई-जालना दरम्यान वंदे भारत ट्रेन नियमित धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जालना-मुंबई वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटन फेरिला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवल्यानंतर गाडी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दाखल झाली आहे. प्रवाशांसाठी सोमवारी दुपारी 1.10 वाजता सदर गाडी सीएसएमटीहून रवाना होणार असून तब्बल 7 तास 20 मिनिटांच्या प्रवासानंतर रात्री साडेआठ वाजता जालन्याला पोहोचणार आहे. बुधवार वगळता आठवडयाचे सर्व दिवस ही गाडी धावणार आहे. जालना-मुंबई या वंदे भारत ट्रेनचे सहाय्यक लोको पायलट म्हणून सारथ्य करण्याचा मान मिळाली आहे. 27 वर्षीय असलेली कल्पना छत्रपती संभाजीनगर जिह्यातील असून फुलांब्रीतील आहे. ती सध्या रेल्वेत लोको पायलट म्हणून कार्यरत आहे.