म्हाडा आणि बिल्डरचे लागेबांधे खपवून घेतले जाणार नाहीत, हायकोर्टाने दिला सज्जड दम

म्हाडा आणि बिल्डरचे लागेबांधे कदापी खपवून घेतले जाणार नाहीत, असा सज्जड दम उच्च न्यायालयाने नुसता दिला नसून तशी नोंद आदेशात केली. सुगंधा खरात यांना ट्रान्झिट रूममधून जबरदस्ती घराबाहेर काढले. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने म्हाडा व पोलिसांवर चांगलेच ताशेरे ओढले.

अल्फा सना रिअॅलटर्सच्या सांगण्यावरूनच म्हाडा व पोलिसांनी खरात पुटुंबीयांना घरातून हुसकावले. म्हाडा व पोलिसांच्या मदतीशिवाय ही कारवाई अशक्य होती, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून चौकशीचा अहवाल 16 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयात सादर करावा, असे आदेश न्या. एम. एस. सोनक व न्या. कमल खाथा यांच्या खंडपीठाने दिले.

z लोअर परळ येथील घर दुसऱयाला देण्यात आले आहे. मात्र माझगाव येथे पर्यायी घर खरात यांना देता येईल. या घराचे भाडे बिल्डरला द्यावे लागेल, असे म्हाडाचे वकील प्रकाश लाड यांनी खंडपीठाला सांगितले. न्यायालयाने बिल्डरला या घराचे एक वर्षाचे आगाऊ भाडे देण्याचे आदेश दिले.

काय आहे प्रकरण

खरात व त्यांचे कुटुंबीय लोअर परळ येथील पिरामल कम्पाऊंडमध्ये राहत होते. 2016 मध्ये त्यांना हे ट्रान्झिट घर मिळाले होते. खरात यांनी लघुवाद न्यायालयात या घराचा दावा दाखल केला आहे. हा दावा प्रलंबित आहे. 7 नोव्हेंबर 2023 रोजी म्हाडाने पोलिसांना पत्र लिहिले. या महिलेने ट्रान्झिट घरात घुसखोरी केली आहे. तिच्यावर कठोर कारवाई करावी, असे म्हाडाने पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर 14 डिसेंबर 2023 रोजी खरात व त्यांच्या पुटुंबीयांना जबरदस्ती घरातून बाहेर काढण्यात आले. त्याविरोधात ही याचिका कsली.