आयोगाने कितीही घोळ घातला तरी पदवीधरची जागा शिवसेनाच जिंकणार! आदित्य ठाकरे यांचा ठाम विश्वास

मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांनी अनेक वेळा शिवसेनेच्या बाजूने कौल दिला आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादीमधून कितीही नावे वगळण्याचा प्रयत्न केला, घोटाळे करण्याचा प्रयत्न केला तरी यावेळीही ही निवडणूक शिवसेना जिंकणार म्हणजे जिंकणारच, असा ठाम आत्मविश्वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

आदित्य ठाकरे आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या उपस्थितीत मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अॅड. अनिल परब यांच्या निवडणूक ‘वचननामा’चे प्रकाशन आज वांद्रे-कुर्ला संकुलातील मुंबई क्रिकेट असोसिएशन क्लबमधील इनिंग्ज हॉलमध्ये आयोजित पदवीधर संवाद मेळाव्यात करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे बोलत होते.

पदवीधरांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न – अनिल परब

पदवीधरांना न्याय देण्याचा प्रयत्न शिवसेनेने वचननाम्यात केला असून ती वचने पूर्ण करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू असे अभिवचन यावेळी अनिल परब यांनी दिले. मुंबईत इंटरनॅशनल फायनान्स सेंटर स्थापन करण्याबरोबर रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे आपले लक्ष्य आहे असे ते म्हणाले. विविध परीक्षांमध्ये होणाऱया घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी आयएएस, आयपीएस दर्जाच्या अधिकाऱयांच्या नेतृत्वाखाली विशेष कक्ष स्थापन करण्याची गरज आहे असे ते पुढे म्हणाले.

शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवावा – भालचंद्र मुणगेकर

शिक्षण व्यवस्था हा भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे, खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत भ्रष्टाचार बोकाळला आहे, त्याविरुद्ध पदवीधरांनी आवाज उठवावा, असे आवाहन यावेळी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले. पाच वेळा हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने सहाव्यांदा तो पुन्हा शिवसेनेकडेच येण्यास काहीच अडचण येणार नाही असे ते म्हणाले. यावेळी शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे उपस्थित होते.

कायदा बनवला, पण पेपर फोडणाऱयांना शिक्षा होणार का?

पेपर फोडणाऱयाला कडक शिक्षा करण्याचा कायदा इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही करू असे आश्वासन शिवसेनेने सातत्याने दिले होते. आता भाजप सरकारने पेपर पह्डेल त्याला दहा वर्षांची शिक्षा करण्याचा कायदा बनवला आहे, पण त्याची अंमलबजावणी होणार की नाही हा प्रश्नच आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

सीईटी परीक्षेच्या पेपरमध्ये 54 चुका झाल्या होत्या. त्यावर मागच्या वेळी 40 चुका झाल्या होत्या, यावेळी 54 चुका झाल्या, ही परंपराच आहे असे स्पष्टीकरण निर्लज्जपणे आज शिक्षण संचालकांकडून देण्यात आले. हा प्रकार गंभीर असून त्याविरुद्ध शिवसेना विधिमंडळात निश्चितच आवाज उठवेल.

दर्जेदार शिक्षणाचा अधिकार देणारा कायदा हवा

शिक्षण हेच आपल्या समाजाला आणि देशाला पुढे नेऊ शकते. पण त्यासाठी केजी टू पीजी शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत आदित्य ठाकरे यांनी मांडले.

सिनेट निवडणुकीला भाजप घाबरला

सिनेट निवडणुकीला भारतीय जनता पक्ष घाबरला आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. सिनेट निवडणुकीतील दहापैकी दहा जागा शिवसेना जिंकेल याच भीतीने सिनेटची निवडणूक घेतली जात नाही, असे ते म्हणाले.

असा आहे वचननामा

z सर्व शासकीय नोकरीच्या परीक्षा आणि पदांच्या अर्जासाठी पदवीधरांना एका वर्षात फक्त एक वेळचे वार्षिक शुल्क आकारणी करण्यास शासनाला भाग पडणार.
z मुंबई उपनगरात बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमीची शाखा स्थापन करणार.
z व्हिसा, पासपोर्ट प्रक्रिया, परदेशी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश यासंदर्भात ‘हेल्प डेस्क’ची स्थापना करणे.
z पदवीधरांना पुरेशा संधी उपलब्ध करून देण्यासाठी वार्षिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रोजगार आणि शैक्षणिक मेळावा आयोजित करणार.
z विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाला आपल्या हक्काची घरे मिळावी या उद्देशाने अशासकीय विधेयक सादर करणार.
z मुंबईत मोफत रुग्णवाहिका आणि मुंबईतील रक्तपेढय़ांमधून मोफत रक्त पुरवठय़ासाठी प्रयत्न करणार.
z दर्जेदार आरोग्यसेवा मिळाव्यात म्हणून पदवीधर मतदारांसाठी वैद्यकीय विमा लागू करण्यासाठी प्रयत्न करणार.
z मुख्यमंत्री फेलोशिपच्या धर्तीवर पदवीधरांसाठी विधान प् ारिषद आमदार फेलोशिप प्रोग्राम राबवणार.