मुलुंडमध्ये दोघा बांगलादेशींना अटक 

अवैधपणे राहणाऱया दोन बांगलादेशी नागरिकांना मुलुंड पोलिसांनी अटक केली. सूरज ऊर्फ स्वप्नील बिश्वास आणि कौशिक ऊर्फ इम्रान बिश्वास अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.

मुलुंड येथे दोन बांगलादेशी नागरिक हे नोकरीनिमित्त येत असल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याच्या एटीसी पथकाला मिळाली. त्या माहितीनंतर मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी राघवेंद्र स्वामी मार्ग परिसरात सापळा रचला. सायंकाळी सूरज आणि कौशिक हे तेथे आले. त्या दोघांना मुलुंड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या दोघांकडे हिंदुस्थानी नागरिक असल्याचे कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. कसून चौकशी केल्यावर त्यांनी बांगलादेशी नागरिक असल्याची पोलिसांना कबुली दिली. बांगलादेशातील गरिबी आणि उपासमारीला पंटाळून ते हिंदुस्थानात आले होते.