मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये मॅगीने भरलेला ट्रक चोरांनी लुटल्याची माहिती समोर आली. चोरांनी ट्रक ड्रायव्हरला दारू पाजली व त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत मॅगी घेऊन पसार झाले. या ट्रकमध्ये दहा लाख रुपये किमतीची मॅगी होती. मॅगीने भरलेला कंटेनर पसार केल्यानंतर पोलिसांना फक्त कंटेनर मिळाला, परंतु त्यातील मॅगी चोरांनी गायब केली.