Lok Sabha Election 2024 : अत्याचारी बृजभूषण निवडणूक लढण्यावर ठाम

उत्तर प्रदेशात भाजप आपल्या वाटय़ाच्या 12 जागांवर 10 एप्रिलपूर्वी उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहे, मात्र कैसरगंज येथून उमेदवार देण्यावरून भाजपमध्येच मतभेद निर्माण झाले आहेत. कारण महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप असणारे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी पत्नी किंवा मुलाला कैसरगंजमधून उमेदवारी देण्याचा प्रस्ताव बृजभूषण यांनी फेटाळला असून ते स्वतः या मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वापुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. गेल्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात 12 पैकी 9 जागांवर भाजपने विजय मिळवला होता. केंद्रीय नेतृत्वालाही बृजभूषण सिंह यांनी स्वतः कैसरगंजमधून तगडा उमेदवार द्यावा असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, परंतु त्यांनी हा प्रस्ताव फेटाळला.