देशात आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण, रुग्णाची प्रकृती स्थिर

देशात मंकीपॉक्सचा एक संदिग्ध रुग्ण आढळला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मंकीपॉक्स प्रभावित असलेल्या देशातून एक तरुण देशात आला आहे. या तरुणामध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळली आहेत. या तरुणाला एका रुग्णालयात आयसोलेट करून ठेवले आहे. या रुग्णाची तब्येत स्थिर असून या रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहे.

मंकीपॉक्सचा एक रुग्ण जरी आढळला असला तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती सरकारने दिली आहे. यात कुठलीही चिंता करण्याचे कारण नाही. तसेच बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी होत असून अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे असेही सरकारने म्हटले आहे.