देशातील चांगल्या-वाईटांसाठी हिंदूच जबाबदार, मोहन भागवत यांचे विधान

देशात काही चांगले घड़ले तर हिंदू समाजाची कीर्ती वाढते. पण काही चूक झाली तर त्याची जबाबदारीही हिंदू समाजावर पडते. कारण ते या देशाचे कर्तेधर्ते आहेत, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो तो खरा मानवधर्म आहे. हा जागतिक धर्म आहे आणि तो सर्वांच्या कल्याणाची इच्छा व्यक्त करतो, असेही भागवत म्हणाले.

मोहन भागवत सध्या अलवर दौऱयावर आहेत. शहर संचालनालयाच्या पहिल्या दिवशी इंदिरा गांधी स्टेडियममध्ये ते बोलत होते. काwटुंबिक मूल्यांबाबतही त्यांनी या वेळी चिंता व्यक्त केली. देशात काwटुंबिक मूल्ये धोक्यात आहेत. माध्यमांच्या गैरवापरामुळे नवी पिढी आपली मूल्ये झपाटय़ाने विसरत चालली आहे. हा चिंतेचा विषय आहे, असेही भागवत म्हणाले.