ओबीसी मराठा वाद जाणीवपूर्वक लावला गेला आहे. भाजजपने भाजपनेच मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावला ही वस्तुस्थिती आहे, अशी टीका अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी भाजपवर टीका केली आहे.
अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना बच्चू कडू यांनी भाजपवर टीका केली आहे. ”गरज सरो वैद्य मरो ही भाजपची भूमिका कायम राहिलेली आहे. भाजप सगळ्यांसोबत अशीच वागली आहे”, असे ते म्हणाले.
राज्यात आरक्षणावरून मराठा ओबीसी वादावर बोलताना पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी भाजपला फटकारले आहे. ”ओबीसी मराठा वाद जाणीवपूर्वक लावल्याचे काही पक्षांनी भूमिका घेतल्या आहेत. त्याचे परिणाम वाईट दिसत आहेत. धर्म, जातीच्या विरुद्ध वाद लावणं असं राजकारण काँग्रेस भाजप करते. धार्मिक तेढ, जातीय तेढ निर्माण करून त्या दिशेने महाराष्ट्राला नेण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करतायत. भाजपनेच मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावला ही वस्तुस्थिती आहे”, असे बच्चू कडू यांनी म्हटले.