घोटाळेबाजाला हीरोसारखा निरोप का? मिचेल जॉन्सनची जोरदार टीका

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला कलंकित करणाॊया सॅण्डपेपर गेट कांडात एक वर्षांची बंदी भोगलेल्या घोटाळेबाजाला एखाद्या हीरोसारखी निवृत्ती का दिली जातेय? असा जळजळीत सवाल करत माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला केला आहे. डेव्हिड वॉर्नरला पाकिस्तानविरुद्धच्या सिडनी कसोटीत त्याच्या कारकीर्दीला सन्मानाने निरोप दिला जाणार आहे. पण वॉर्नरला दिली जाणारी निवृत्ती जॉन्सनला चांगलीच खटकलीय आणि त्याने या घटनेवर सर्वांवरच जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

सहा वर्षांपूर्वी सॅण्डपेपर गेट स्पँडलमध्ये डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि पॅमरून बेनक्रॉफ्ट या तिघांनी दोषी ठरवत एक वर्षाची बंदी लादण्यात आली होती. एवढेच नव्हे तर बंदी संपल्यानंतर वॉर्नर आणि स्मिथला संघाचे नेतृत्व करण्यापासूनही रोखण्यात आले होते. मात्र आता हे दोघे ऑस्ट्रेलियाच्या महान खेळाडूंच्या पंक्तीत विसावले असले तरी जॉन्सनच्या लेखी ते आजही घोटाळेबाज आहेत आणि त्यांना सन्मानाने निवृत्त देण्याबाबत त्याचा विरोध आहे.

डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघासाठी अखेरच्या वेळी पांढरी जर्सी परिधान करणार आहे. वॉर्नरची कसोटी कारकीर्द फारशी यशस्वी ठरली नाही. तरीही त्याला आपली अखेरची कसोटी निवडण्याची संधी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिल्याचे जॉन्सनला खटकले आहे. त्यामुळे त्याने आपल्या लेखात वॉर्नरसह त्याला निरोपाची कसोटी देणाऱया सर्वांवर टीका केली आहे.

जॉन्सनने एका वर्तमानपत्रातील आपल्या लेखात लिहिलेय, सर्व डेव्हिड वॉर्नरच्या निरोपाच्या कसोटी सामन्याच्या तयारीला लागलेत, कुणी मला सांगू शकले का असे का ते? धडपडत असलेल्या सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला आपल्या निरोपाची कसोटी निवडण्याची संधी का दिली ? आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील सर्वात मोठय़ा स्पॅण्डलच्या दोषींपैकी एक असलेल्या खेळाडूला हीरोसारखी निवृत्ती का दिली जात आहे आणि त्यांनी ती का हवीय?