जमनाबाई नरसी स्कूलने कमालीचे सातत्य राखताना एमआय ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या 16 वर्षांखालील मुलांच्या साखळी सामन्यात आयईएस राजा शिवाजी विद्यालय, दादरवर 195 धावांच्या फरकाने विजय मिळवला. जय टोलिया (119 चेंडूत 176*) आणि जय (3-8) त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
15 वर्षांखालील मुलींच्या गटात आयईएस हायस्कूल, नवी मुंबईने होली क्रॉस हायस्कूलने मीरा रोडचा 10 विकेट राखून पराभव केला. प्रिया दर्शिनी सिंग (37 चेंडूत 77) आणि ईश्वरी खेत्रीच्या (36 चेंडूत 52) यांच्यातील नाबाद सलामीच्या जोरावर होली क्रॉसने प्रतिस्पर्ध्यांचे 149 धावांचे आव्हान 12 षटकांत पूर्ण केले.