मध्य, पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर उद्या, रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. मध्य रेल्वे मार्गावर ठाणे ते दिवादरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईनवर सकाळी 10.50 ते दुपारी 3.20 पर्यंत तर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवर ब्लॉकदरम्यान  काही जलद लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावर ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-पनवेल/बेलापूर अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटी-कुर्ला, पनवेल-वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील. पश्चिम रेल्वेवर शनिवारी मुंबई सेंट्रल-माहीमदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसेल.