इन्स्टाग्राममुळे सापडली वर्षभरापूर्वी चोरीला गेलेली म्हैस! पोलिसांनी शेतकऱ्याला दिला 8 दिवसांचा वेळ

उत्तर प्रदेशातील बुलंदशहराच्या गुलावठी परिसरातील एक अनोखी घटना समोर आली आहे. कैथला गावातील वर्षभरापूर्वी चोरीला गेलेली म्हैस इन्स्टाग्राममुळे सापडली आहे. पीडित मोहित यांचा मुलगा रोहताशने पोलिसांना याबाबत माहिती दिली होती आणि इन्स्टाग्रामवर आपल्या म्हशीचा फोटो दाखवून ती आपलीच म्हैस असल्याचा दावा केला. पोलिसांनी म्हैस विकणाऱ्या व्यक्तीला बोलावण्यासाठी शेतकऱ्याला आठ दिवसांचा अवधी दिला आहे.

गुलावठी गावातील कैथला निवासी मोहित यांची वर्षभरापूर्वी एक म्हैस चोरीला गेली होती. त्याबाबत पीडित मुलाने पोलीस स्थानकात तक्रार केली होती. मवानातील गाव निलोहाच्या एका कार्यक्रमातील म्हैशीचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला होता. रोहिताशने त्या म्हैशीला ओळखल आणि ती आपलीच असल्याचा दावा केला. 
मोहितने संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सोमवारी गुलावठी पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर सुशील कुमार, अंडर ट्रेनिंग इन्स्पेक्टर अजय आणि एक कॉन्स्टेबल रोहताश यांना घेऊन मवाना पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि नंतर खेडी मनिहार गावात गेले. जेथे शेतकरी परविंद्र म्हशीला घेऊन केंद्रावर ऊस टाकण्यासाठी जात होते. मोहितने त्याची म्हैस ओळखली. या संदर्भात निरीक्षकांनी शेतकऱ्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदर म्हैस शामली येथील भुरा याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिली. यावेळी लोक जमा झाले. गावकऱ्यांच्या विनंतीवरून पोलिसांनी शेतकऱ्याला म्हैस विकणाऱ्या व्यक्तीला बोलावण्यास सांगितले आणि आठ दिवसांनी पुन्हा येऊन म्हैस घेऊन जाण्यास सांगितले आणि म्हशीला घेऊन परतले.