4 तारखेला उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रबळ उमेदवारांमध्ये निवडणुकीची लढाई सुरू होईल, तर अपक्षांसह काहींची लढाई ही डिपॉझिट वाचवण्यासाठी असेल. निवडणुकीत जय-पराजय होत असतो, परंतु उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाल्यास त्याच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसतो. त्यामुळे निवडणुकीला उभे राहिलेले अनेक उमेदवार हे आपले डिपॉझिट जप्त होणार नाही, यासाठी प्रयत्नशील असतात. उमेदवाराला वैध मतांच्या एक षष्टांशपेक्षा अधिक मते मिळाली तर डिपॉझिट वाचते.